इंधनाच्या वाढत्या किमतीपासून 'आम आदमी'ला दिलासा, असे आहेत पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

इंधनाच्या वाढत्या किमतीपासून 'आम आदमी'ला दिलासा, असे आहेत पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

मकर संक्रांतीच्या दिवशी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी: तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Prices) दर कमी जास्त होत असताना आज अखेर दर स्थिरावल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी बुधवारचे (15 जानेवारी) दर जारी केले आहेत. त्यानुसार मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर 10 आणि 11 पैसे प्रतिलिटरमागे स्वस्त झाले होते. आज हेच दर स्थिर आहेत म्हणजेच मंगळवारनुसार आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर असतील अशी माहिती कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दिल्ली कोलकाता, चेन्नई आणि मुंबईत पुढील प्रमाणे पेट्रोल- डिझेलचे दर असतील.

दिल्ली- पेट्रोल 75.70 , डिझेल-69.06

कोलकाता- पेट्रोल 78.29 , डिझेल- 71.43

मुंबई- पेट्रोल 81.29, डिझेल- 72.42

चेन्नई- पेट्रोल 78.65, डिझेल-72.98

चार शहरांचा विचार केला तर सर्वात महाग पेट्रोल आज मुंबईतमध्ये आहे. मुंबईकरांना पेट्रोलसाठी आज लिटरमागे 81 रुपये 29 पैसे मोजावे लागणार आहेत. सणाच्या दिवशी पेट्रोल 80 पार असल्यानं काहीसा हिरमोडही झाला आहे. दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त म्हणजेच लिटरमागे 75 रुपये मोजावे लागत आहेत. असं असलं तरीही मागील 3 दिवसांपासून पेट्रोलचे दर कमी होत आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

दररोज सकाळी 6 वाजता बदलते पेट्रोल-डिझेलची किंमत

पेट्रोल-डिजेलचे दर प्रत्येक दिवशी कमी-जास्त होत असतात. सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत असतात. यांच्या किमती या अबकारी दर, डिलर कमीशनच्या बदलांनुसार घडत असतात.

SMS करा आणि जाणून घ्या पेट्रोलचे नवे दर

तुम्ही एका SMSने आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. SMSकरून इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे दर जाणून घेऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249 या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. तर, बीपीसीएल ग्राहकांसाठी RSP<डीलर कोड> 9223112222 हा क्रमांक आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: January 15, 2020, 9:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading