Home /News /money /

Petrol-Diesel Prices Today: IOCL कडून पेट्रोल-डिझेल दर जारी, मुंबईत काय आहे आजचा भाव

Petrol-Diesel Prices Today: IOCL कडून पेट्रोल-डिझेल दर जारी, मुंबईत काय आहे आजचा भाव

सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल-डिझेल किंमतीत बदल केलेले नाहीत. इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे.

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : IOCL ने पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल-डिझेल किंमतीत बदल केलेले नाहीत. राष्ट्रीय राजधआनी दिल्लीत आज रविवारी पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. मागील जवळपास अडीच महिन्यांपासून किंमती स्थिर आहेत. 4 नोव्हेंबर 2021 पासून इंधन दरात बदल झालेला नाही. देशातील प्रमुख शहरांमध्ये आजचा भाव - – दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर – मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर – चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर – कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर – लखनऊ पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लीटर

    हे वाचा - Budget 2022: निर्मला सीतारामन यांच्या या उपाययोजना सामान्यांना देणार मोठा दिलासा

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे. महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल दर (Today's Petrol and Diesel Prices in Maharashtra) -
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे109.45 रुपये92.25 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
    नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
    अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
    औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
    रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
    रायगड109.48 रुपये92.25 रुपये
    परभणी112.49 रुपये95.17 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली110.03 रुपये92.83 रुपये
    कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये

    हे वाचा - Ration Card: रेशन कार्ड नसेल तरीही मोफत मिळेल अन्नधान्य, इथे वाचा सर्व प्रक्रिया

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या