Home /News /money /

Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर, इथे तपासा तुमच्या शहारातील आजचा भाव

Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर, इथे तपासा तुमच्या शहारातील आजचा भाव

आजही इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. जवळपात अडीच महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहे. मुंबईत आज पेट्रोल दर (Petrol Price in Mumbai Today) 109.98 रुपये आहे. तर डिझेल दर 94.14 रुपये प्रति लीटर आहे.

    नवी दिल्ली, 22 जानेवारी : सरकारी तेल कंपन्यांनी आज शनिवारी पेट्रोल-डिझेलचे रेट जारी केले आहेत. आजही इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. जवळपात अडीच महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहे. इंधन दरात 4 नोव्हेंबर 2021 पासून कोणताही बदल झालेला नाही. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर इंधन दर काही प्रमाणात कमी झाले. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. इंधनाचे दर वाढत नसले तरी ते कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला पेट्रोल-डिझेल खरेदी करताना चाप बसतोच आहे.

    हे वाचा - 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांवर पैशाचा पाऊस; 210 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स

    राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत आज पेट्रोल दर (Petrol Price in Mumbai Today) 109.98 रुपये आहे. तर डिझेल दर 94.14 रुपये प्रति लीटर आहे. Today's Petrol and Diesel Prices in Maharashtra
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे109.45 रुपये92.25 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
    नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
    अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
    औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
    रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
    रायगड109.48 रुपये92.25 रुपये
    परभणी112.49 रुपये95.17 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली110.03 रुपये92.83 रुपये
    कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये

    हे वाचा - मोदी सरकार देणार 10000 रुपये, 'या' वर्गाला होईल फायदा; वाचा सविस्तर

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या