खूशखबर! सलग चौथ्या दिवशी Petrol-Diesel झालं स्वस्त

खूशखबर! सलग चौथ्या दिवशी Petrol-Diesel झालं स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यानं पेट्रोल-डिझेलची किंमतही कमी होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मार्च : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळं सलग चौथ्यादिवशी तेलांच्या किंमती कमी झाल्या. रविवारीसुद्धा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात कऱण्यात आली. इंडियन ऑइलने रविवारी पेट्रोलचा दर लिटरमागे 12 पैसे तर डिझेलचा दर 14 पैसे कमी केला. दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर 69.75 रुपये इतके झाले आहेत. तर डिझेल 62.44 रुपये प्रति लिटर आहे.

दिल्लीशिवाय कोलकत्त्यात पेट्रोलचे 72.45 रुपये लिटर तर डिझेल 64.77 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहेत. मुंबईत पेट्रोल 75.45 रुपये तर डिझेल 65.37 रुपये झालं आहे. चेन्नईत सुद्धा पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले असून पेट्रोल 72.45 रुपये तर डिझेल 65.88 रुपये प्रति लिटर इतक्या दराने मिळत आहे.

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. OPEC देशांनी प्रोडक्शनमध्ये कपात न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या कारणामुळे भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर 4 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. US WTI आणि ब्रेंट क्रुड (Brent Crude Oil) च्या दरातही घट झाली आहे. दोन्ही कच्च्या तेलांची किंमत क्रमश: 10.07 % आणि 9.4 टक्क्यांनी उतरली आहे. ओपेक आणि त्यांच्या सहकारी देशांच्या बैठकीमध्ये  क्रुड प्रोडक्शनमध्ये कपात करण्यावर निर्णय झाला नाही.

हे वाचा : मोबाइल खरेदी महागणार, GST परिषदेमध्ये झाला महत्त्वाचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2020 10:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading