Home /News /money /

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

मुख्य आर्थिक सल्लागारांनी अलीकडेच सांगितले होते की ब्रेंट क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर राहिल्यास, कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यास भाग पाडले जाईल.

    मुंबई, 18 मे : जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Prices) प्रति बॅरल 113 डॉलर आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलरच्या वर आहे. त्यामुळे असा अंदाज आहे की लवकरच सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्या स्वतःवरील दबाव कमी करण्यासाठी इंधनाच्या किरकोळ किमतीत वाढ करू शकतात. मुख्य आर्थिक सल्लागारांनी अलीकडेच सांगितले होते की ब्रेंट क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर राहिल्यास, कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यास भाग पाडले जाईल. याचा विचार करून आता पेट्रोलियम कंपन्या लवकरच दर वाढीची घोषणा करू शकतात. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सुमारे 43 दिवस स्थिर असून, शेवटची दरवाढ 6 एप्रिल रोजी करण्यात आली होती. Business Idea: पेट्रोल-डिझेल ऑनलाईन विक्रीचा व्यवसाय सुरु करा, वर्षभरात कोट्यवधींची उलढाल शक्य चार महानगरांत पेट्रोल-डिझेल दर >> मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर >> दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. CIBIL Score कमी असला तरी घेता येईल पर्सनल लोन, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या