Home /News /money /

Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, चेक तुमच्या शहरातील इंधनाचा भाव

Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, चेक तुमच्या शहरातील इंधनाचा भाव

ब्रेंट क्रूडची किंमत सध्या प्रति बॅरल 114 डॉलर आहे आणि जर ती या उच्च पातळीवर राहिली तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याचा दबाव कंपन्यांवर वाढेल.

    मुंबई, 17 मे : जागतिक बाजारात, कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Prices) प्रति बॅरल 114 डॉलरवर पोहोचली आहे. दरम्यान सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनीही मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले आहेत. क्रुडच्या किमती वाढत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे. तेल कंपन्यांनी रविवारीच सीएनजीच्या दरात (CNG Prices) वाढ केली होती, मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर तब्बल 41 दिवस स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी मार्च-एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10.20 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. गेल्या वेळी 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. ब्रेंट क्रूडची किंमत सध्या प्रति बॅरल 114 डॉलर आहे आणि जर ती या उच्च पातळीवर राहिली तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याचा दबाव कंपन्यांवर वाढेल. OMG! पगारात रोख रक्कम नाही तर 'सोनं' ऑफर करते ही कंपनी; काय आहे यामागील कारण? चार महानगरांत पेट्रोल-डिझेल दर >> मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर >> दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. तरुणांनी करिअरच्या सुरुवातीलाच घर घरेदी करावं का? काय होईल फायदा? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर  पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या