Home /News /money /

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, चेक करा पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, चेक करा पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर

तेल कंपन्यांनी एक दिवसापूर्वी सीएनजीच्या दरात वाढ केली होती, मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तब्बल 41 दिवस स्थिर ठेवले आहेत.

    मुंबई, 16 मे : सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Prices) नवे दर जाहीर केले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर प्रति बॅरल 112 डॉलरवर पोहोचले असतानाही तेल कंपन्यांनी आजही दरात कोणताही बदल केलेला नाही. तेल कंपन्यांनी एक दिवसापूर्वी सीएनजीच्या दरात (CNG Prices) वाढ केली होती, मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तब्बल 41 दिवस स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी मार्च-एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10.20 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ ६ एप्रिल रोजी झाली होती. मात्र जर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 110 च्या वर राहिली तर तेल कंपन्या पुन्हा एकदा किंमती वाढवू शकतात. LIC चे स्वस्तात शेअर खरेदीची संधी, कसं? तज्ज्ञांकडून समजून घ्या चार महानगरांत पेट्रोल-डिझेल दर >> मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर >> दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. Cibil स्कोअर जितका चांगला तितकी कर्ज मिळण्याची शक्यता वाढते; लगेच चेक करा तुमचा सिबिल स्कोअर SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या