Home /News /money /

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी, पेट्रोल-डिझेल किती रुपयांना विकलं जातंय?

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी, पेट्रोल-डिझेल किती रुपयांना विकलं जातंय?

महाराष्ट्रातील परभणी येथे सध्या देशातील सर्वात महाग पेट्रोल 114.38 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी, आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये सर्वात महाग डिझेल 100.30 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

    मुंबई, 12 जून : सरकारी तेल कंपन्यांनी (Oil Companies) आज 12 जून रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले आहेत. आज सलग 23 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारच्या (Central Government) उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या निर्णयानंतर गेल्या 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या होत्या. पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये अबकारी कर कमी करून सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. पेट्रोल-डिझेल महाग होऊ शकते येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा जनतेला महागाईचा फटका सहन करावा लागू शकतो. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. कारण भारत जे कच्चे तेल खरेदी करतो ते प्रति बॅरल 121 या दशकाच्या उच्चांकावर आहे. कच्च्या तेलाची ही किंमत फेब्रुवारी/मार्च 2012 मध्ये नोंदवण्यात आली होती. Business Idea: केवळ 1 लाखात सुरू करा हा सुपरहिट बिझनेस, दर महिन्याला 8 लाखांची होईल कमाई प्रमुख शहरातील इंदनाचे दर? मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर बंगळुरू - पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर हैदराबाद - पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर Business Idea: तुमची नोकरी गेलीय का? तर ‘या’ 3 पानांचा घरबसल्या करा व्यवसाय; होईल लाखोंची कमाई सर्वात स्वस्त पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी येथे सध्या देशातील सर्वात महाग पेट्रोल 114.38 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्याचवेळी, आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये सर्वात महाग डिझेल 100.30 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याशिवाय सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. तेथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या