Home /News /money /

Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? उत्पादन शुल्क पूर्ववत होणार?

Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? उत्पादन शुल्क पूर्ववत होणार?

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) वाढत्या किमतींमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती.

    मुंबई, 30 जानेवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) 1 फेब्रुवारी 2022 रोजी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी (FY23) केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात (Budget 2022) अर्थमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) पुन्हा लागू करण्याची मागणी होत आहे. उत्पादन शुल्क पूर्ववत करण्याची मागणी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) वाढत्या किमतींमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती. उत्पादन शुल्कातील ही कपात महामारीपूर्वीच्या परिस्थितीपेक्षा खूपच कमी असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत सरकारने उत्पादन शुल्क पुन्हा लागू करावे. उत्पादन शुल्क महसूल वाढवण्यास मदत करते 2020 मध्ये, केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या काळात आपली तिजोरी वाढवण्यासाठी उत्पादन शुल्काच्या रूपात एक चांगला मार्ग शोधला. त्यामुळे महसूल वाढला पण इंधन महाग झाले. नोव्हेंबर 2021 च्या सुरूवातीला उत्पादन शुल्कात केलेली कपात ही फेब्रुवारी 2021 पर्यंत करण्यात आलेल्या वाढीच्या केवळ 15-30 टक्के होती. दै. भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, इतर महसुलातील तूट, जी 2020-21 मध्ये जवळजवळ भरून काढली गेली आहे, ती आता आगामी अर्थसंकल्पासाठी मोठी डोकेदुखी नाही, कारण अर्थव्यवस्था वाढत आहे. त्यामुळे अबकारी दरात आणखी कपात करण्यासाठी जागा निर्माण केली जात आहे. आगामी आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा सर्वोत्तम निर्णय असला तरी अर्थसंकल्पात उत्पादन शुल्कात कपात होण्याची शक्यता नाही. अर्थसंकल्प 2022, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार यावेळी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी संपेल. 1 फेब्रुवारी 2022 रोजी देशासमोर सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. सत्राचा पहिला भाग 11 फेब्रुवारीला संपणार आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर, सत्राचा दुसरा भाग 14 मार्चपासून सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी संपेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Budget, Petrol and diesel, Petrol and diesel price, Union budget

    पुढील बातम्या