मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी, मुंबईत पेट्रोल 107 रुपयांपार

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी, मुंबईत पेट्रोल 107 रुपयांपार

Petrol-Diesel Price Today: IOCL च्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लीटर आहेत.

Petrol-Diesel Price Today: IOCL च्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लीटर आहेत.

Petrol-Diesel Price Today: IOCL च्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लीटर आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट: पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जारी करण्यात आले आहेत. दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी केले जातात. दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरानुसार आजही या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. अर्थात सलग 26व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नाही आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) घसरण झाली आहे. मात्र यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. क्रूड ऑइलच्या किंमती कमी होऊन देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले नाहीत.  IOCL च्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लीटर आहेत. मे महिन्यात झाली विशेष वाढ मे महिन्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर आता 25 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे  स्थिर आहेत. त्याआधी 42 दिवस झालेल्या इंधनवाढीबाबत बोलायचे झाले कर, पेट्रोल जवळपास 11.52 रुपये प्रति लीटरने महागले होते. तर डिझेल 9.08 रुपये प्रति लीटरने महागले होते. हे वाचा-SBI-PNB सह या बँकांच्या ATM मधून किती काढता येतील पैसे? वाचा काय आहे नियम असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. हे वाचा-Jan Dhan Account: 6 कोटी जन धन खाती झाली निष्क्रिय, तुमचं खातं देखील आहे का? दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात. पेट्रोल-डिझेलचे आजचे दर >> दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर >> मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.45 रुपये प्रति लीटर >> चेन्नई - पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर >> कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर >> भोपाळ - पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर हे वाचा-Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई >> बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर >> लखनऊ -पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर >> पाटणा - पेट्रोल 104.25 रुपये आणि डिझेल 95.57 रुपये प्रति लीटर >> जयपूर - पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर >> गुरुग्राम - पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर
First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Petrol price

पुढील बातम्या