Home /News /money /

Petrol Price Today: सलग पाचव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, मुंबईत अद्यापही पेट्रोल शंभरीपार

Petrol Price Today: सलग पाचव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, मुंबईत अद्यापही पेट्रोल शंभरीपार

Petrol and Diesel Price Today

Petrol and Diesel Price Today

Petrol-Diesel Price Today: आयओसीएल (IOCL) च्या मते, पेट्रोल-डिझेलचे दर आज पाचव्या दिवशी देखील स्थिर आहेत.

    नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) आज जारी झाले आहेत. दररोज सकाळी सहा वाजता इंधनाचे दर अपडेट केले जातात. दरम्यान पेट्रोल-डिझेलचे दर आज पाचव्या दिवशी देखील स्थिर आहेत. आयओसीएलच्या मते आज रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नाही आहेत. या आठवड्यात मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करत सामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. मंगळवारी पेट्रोलचे दर 15 पैशांनी तर डिझेलही 15 पैशांनी स्वस्त झालं होतं. त्याआधी रविवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या होत्या. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price in Mumbai) 107.52 रुपये आणि डिझेलचे दर (Diesel Price in Mumbai) 96.48 रुपये प्रति लीटर आहेत. आजचे इंधनाचे दर >> दिल्ली पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 88.92 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.52 रुपये आणि डिझेल 96.48 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 99.20 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर हे वाचा-Mutual Fund SIPत कशी कराल गुंतवणूक? मुलांचं शिक्षण ते घर घेण्यासाठी होईल फायदा >> कोलकाता पेट्रोल 101.82 रुपये आणि डिझेल 91.98 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.79 रुपये आणि डिझेल 89.49 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.42 रुपये आणि डिझेल 98.06 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.91 रुपये आणि डिझेल 97.72 रुपये प्रति लीटर अशाप्रकारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-e-SHRAM card: लगेच बनवा हे महत्त्वाचं कार्ड; 2 लाखांपर्यंत सुविधा मिळतील मोफत तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price hike

    पुढील बातम्या