• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Petrol price today: पाहा काय आहे तुमच्या शहरात आजचा पेट्रोल-डिझेल रेट, एका क्लिकवर असं तपासा

Petrol price today: पाहा काय आहे तुमच्या शहरात आजचा पेट्रोल-डिझेल रेट, एका क्लिकवर असं तपासा

मागील मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली होती. ही कपात 15 पैसे प्रति लीटर इतकी करण्यात आली होती. त्यानंतर इंधन दर स्थिर आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : सरकारी तेल कंपन्यांकडून मंगळवारी इंधन दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. IOCL नुसार, रविवारपासून देशाची राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा भाव 101.9 रुपये आणि डिझेलचा दर 88.92 रुपये प्रति लीटर आहे. एक आठवड्यापूर्वी, मागील मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी इंधन दरात कपात केली होती. ही कपात 15 पैसे प्रति लीटर इतकी करण्यात आली होती. त्यानंतर इंधन दर स्थिर आहे. पेट्रोल-डिझेल भाव (Petrol Diesel Price on 31 August 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 88.92 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.52 रुपये आणि डिझेल 96.48 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 99.20 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल दर 101.82 रुपये आणि डिझेल 91.98 रुपये प्रति लीटर >> नोएडात पेट्रोल 98.79 रुपये आणि डिझेल 89.49 रुपये प्रति लीटर >> जयपुरमध्ये पेट्रोल 108.42 रुपये आणि डिझेल 98.06 रुपये प्रति लीटर >> भोपाळमध्ये पेट्रोल 109.91 रुपये आणि डिझेल 97.72 रुपये प्रति लीटर 19 राज्यात पेट्रोल 100 पार - देशभरात जवळपास 19 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे.

  पोस्ट ऑफिसची भन्नाट स्कीम: गुंतवा अवघे 50 हजार आणि खात्यात जमा होईल इतकी पेन्शन

  असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर - पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएसच्या (SMS) माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर हा कोड मिळेल.

  पोस्ट ऑफिसच्या 'या' 9 योजनांमध्ये गुंतवा पैसे; मिळणार भरघोस परतावा; बघा details

  दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर - दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
  Published by:Karishma
  First published: