मराठी बातम्या /बातम्या /मनी /Petrol Diesel Price: 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकेल पेट्रोल, तपासा आज काय आहेत इंधनाचे दर

Petrol Diesel Price: 5 रुपयांनी स्वस्त होऊ शकेल पेट्रोल, तपासा आज काय आहेत इंधनाचे दर

Petrol Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांनी जवळपास एका महिन्यानंतर इंधनाच्या किंमतीत बदलाव केले आहेत. गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत 23 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 26 पैशांनी वाढ झाली आहे.

Petrol Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांनी जवळपास एका महिन्यानंतर इंधनाच्या किंमतीत बदलाव केले आहेत. गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत 23 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 26 पैशांनी वाढ झाली आहे.

Petrol Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांनी जवळपास एका महिन्यानंतर इंधनाच्या किंमतीत बदलाव केले आहेत. गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत 23 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 26 पैशांनी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली, 08 जानेवारी: सार्वजनिक क्षेत्रातील तेलकंपन्या इंडियन ऑयल कॉरपोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी जवळपास एका महिन्यानंतर इंधनाच्या किंमतीत बदलाव केले आहेत. गुरुवारी पेट्रोलच्या किंमतीत 23 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 26 पैशांनी वाढ झाली आहे. तरआज शुक्रवारी इंधनाच्या दरात (Petrol Diesel Price) कोणतेही बदल झाले नाही आहेत.

दरम्यान रेकॉर्ड स्तरावर पोहोचलेल्या किंमतींपासून सामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चांकी पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा देण्याची  शिफारस केली आहे. मंत्रालयाने असे म्हटले आहे की, उत्पादन शुल्क कमी करून सामान्यांना दिलासा दिला जाऊ शकतो.

(हे वाचा-अलर्ट! टोल फ्री क्रमांकासारख्या दिसणाऱ्या या नंबरवर कॉल करताय? RBI ने दिला इशारा)

मंत्रालयाच्या मते कोरोना काळात पेट्रोल-डिझेलवर वाढवण्यात आलेल्या उत्पादन शुल्कात 50 टक्क्याने कपात केली तरी देखील पेट्रोलचे दर 5 रुपयांपर्यंत प्रति लीटरमागे कमी होऊ शकतात. लॉकडाऊन काळात सरकारने पेट्रोलवर एकरकमी 10 रुपये उत्पादन शुल्क वाढवलं होतं. मंत्रालयाने असं म्हटलं आहे की उत्पादन शुल्कात कपात केली गेली तर ग्राहकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यांना देखील सहकार्य करावे लागेल.

महानगरांमधील आजचे दर

दिल्ली- पेट्रोल 84.20 रुपये आणि 74.38 रुपये लीटर

मुंबई- पेट्रोलचे दर 90.83 रुपये आणि डिझल 81.07 रुपये लीटर

कोलकाता- पेट्रोल 85.68 रुपये आणि डिझल 77.97 रुपये लीटर

चेन्नई- पेट्रोल 86.96 रुपये आणि डिझलचे दर 79.72 रुपये लीटर

(हे वाचा-तुमच्याकडे केवळ 3 दिवस शिल्लक,लवकरात लवकर भरा ITR अन्यथा द्यावा लागेल दुप्पट दंड)

बेंगळुरु- पेट्रोल 87.04 रुपये आणि डिझेल 78.87 रुपये लीटर

नोएडा- पेट्रोल 84.06 रुपये आणि डिझेल 74.82 रुपये लीटर

गुरुग्राम- पेट्रोल 82.39 रुपये आणि डिझेल 74.97 रुपये प्रति लीटर

लखनऊ- पेट्रोल 83.98 रुपये आणि डिझेल 74.74 रुपये प्रति लीटर

पाटणा- पेट्रोल 86.75 रुपये आणि डिझेल 79.51 रुपये प्रति लीटर

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर

तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून हे दर जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel