Home /News /money /

Petrol diesel price today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, असा तपासा तुमच्या शहरातील रेट

Petrol diesel price today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, असा तपासा तुमच्या शहरातील रेट

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरू आहे. शिवाय तज्ज्ञांनी यात आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीतही घट होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सरकारी तेल कंपन्यांमध्ये पेट्रोल-डिझेल दरात (Petrol diesel price today) कोणतीही वाढ झालेली नाही. याआधी रविवारी रक्षाबंधनाच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 20 पैसे प्रति लीटर घसरण झाली होती. सोमवारी दिल्लीत 1 लीटर पेट्रोलचा भाव 101.64 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरू आहे. शिवाय तज्ज्ञांनी यात आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीतही घट होण्याची शक्यता आहे. >> दिल्लीत पेट्रोल 101.64 रुपये आणि डिझेल 89.07 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.66 रुपये आणि डिझेल 96.64 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 99.32 रुपये आणि डिझेल 93.66 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 101.93 रुपये आणि डिझेल 92.13 रुपये प्रति लीटर >> नोएडात पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 89.64 रुपये प्रति लीटर >> जयपुरमध्ये पेट्रोल 108.56 रुपये आणि डिझेल 98.22 रुपये प्रति लीटर >> भोपाळमध्ये पेट्रोल 110.06 रुपये आणि डिझेल 97.88 रुपये प्रति लीटर 19 राज्यात पेट्रोल 100 पार - देशभरात जवळपास 19 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर - दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

    ATM Cash Withdrawal Rules: ATM मध्ये पैसे नसल्यास इथे करा तक्रार

    असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर - पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएसच्या (SMS) माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या