• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: इंधनाच्या दरामुळे सामान्यांच्या खिशाला चाप, सलग आठव्या दिवशी वधारले पेट्रोल-डिझेलचे भाव

Petrol Price Today: इंधनाच्या दरामुळे सामान्यांच्या खिशाला चाप, सलग आठव्या दिवशी वधारले पेट्रोल-डिझेलचे भाव

Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today

सरकारी तेल कंपन्यांनी सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel price today) दरात वाढ केली आहे. इंधनाच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे सध्या सामान्यांच्या पेट्रोल-डिझेल न परवडणारे झाले आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: सततच्या वाढत्या इंधन दरामुळे सामान्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel price today) दरात वाढ केली आहे. आज देशभरातील विविध शहरात पेट्रोलचे (Petrol-diesel price on 08th October 2021) दर 110 रुपये प्रति लीटरच्या जवळपास आहेत. सरकारी तेल कंपन्यानी आज पेट्रोलच्या किंमतीत 30 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलचे दर 35 पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 109.54 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर 99.92 रुपये आहेत. चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 08 October 2021) >> दिल्ली पेट्रोल 103.54 रुपये आणि डिझेल 92.12 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 109.54 रुपये आणि डिझेल 99.92 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.01 रुपये आणि डिझेल 96.60 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 104.23 रुपये आणि डिझेल 95.23 रुपये प्रति लीटर महागाईचा फटका! Ice Cream चा गोडवाही आता महागणार, लागणार 18% GST या राज्यांत 100 रुपयांपार पेट्रोल मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपार आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कर आणि वाहतुकीच्या खर्चामुळे विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील फरक असतो. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या जातात. Home Loan: स्वस्तात घरखरेदीची सुवर्णसंधी! BoB ने घटवले गृहकर्जावरील व्याजदर अशाप्रकारे तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: