• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: ऑक्टोबर महिन्यात 20 वेळा इंधनवाढ; तपासा तुमच्या शहरातील आजचा दर

Petrol-Diesel Price Today: ऑक्टोबर महिन्यात 20 वेळा इंधनवाढ; तपासा तुमच्या शहरातील आजचा दर

मुंबईत पेट्रोल दर 113.46 रुपये आणि डिझेल दर 104.38 रुपये प्रति लीटर आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : सरकारी तेल कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल-डिझेलसाठीचे नवे दर जारी केले आहेत. आज इंधन दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. याआधी मागील जवळपास 20 दिवसांपासून पेट्रोल-डिझेल किंमतीत सतत वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. अनेक शहरांत पेट्रोल दर 120 रुपयांजवळ पोहोचला आहे. मुंबईत पेट्रोल दर 113.46 रुपये आणि डिझेल दर 104.38 रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीत पेट्रोल दर 107.59 रुपये, तर डिझेल दर 96.32 रुपये प्रति लीटर आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत तब्बल 20 वेळा इंधन दर वाढले आहेत. केवळ चार दिवस सोडून दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल 5.15 रुपये, डिझेल 5 रुपयांनी महागलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी असल्याने पेट्रोल-डिझेलचा भाव सतत वाढतो आहे. चार महानगरात पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 25 October 2021) - >> दिल्ली पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 96.32 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 113.46 रुपये आणि डिझेल 104.38 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 104.52 रुपये आणि डिझेल 100.59 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 108.11 रुपये आणि डिझेल 99.43 रुपये प्रति लीटर

    पेट्रोल 23.88रुपये,तर डिझेल 22.21 रुपयांनी महागलं,20 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.
    Published by:Karishma
    First published: