Home /News /money /

Petrol Diesel Prices : क्रूड ऑईलच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल-डिझेल महागणार? तपासा आजचा भाव

Petrol Diesel Prices : क्रूड ऑईलच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल-डिझेल महागणार? तपासा आजचा भाव

कंपन्यांनी 6 एप्रिलनंतर किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. याआधी 23 मार्चपासून ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 14 वेळा वाढ करण्यात आली होती.

    नवी दिल्ली, 25 मे : केंद्र सरकारने एकीकडे पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करुन जनतेला दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे क्रूड ऑईलच्या वाढत्या किंमती पेट्रोलियम कंपन्यांवर पुन्हा किमती वाढवण्याचा दबाव टाकत आहेत. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणतेही बदल केले नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सकाळी ब्रेंट क्रूडचा भाव 114 डॉलरवर गेला आहे. जाणकारांनी या आधी जर जर कच्च्या तेलाचा भाव 110 डॉलरहून वर गेल्यास पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढू शकतो असं म्हटलं होतं. कंपन्यांनी 6 एप्रिलनंतर किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. याआधी 23 मार्चपासून ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 14 वेळा वाढ करण्यात आली होती. या काळात इंधन दर 10.20 रुपये प्रति लीटरने वाढवण्यात आला होता. चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर – मुंबईमध्ये पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लीटर – चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर SMS किंवा कॉलद्वारे जाणून घ्या इंधन दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    हे वाचा - Inflation in India: महागाईचा उच्चांक, 10 वर्षांपूर्वी 100 रुपयांना मिळणारी वस्तू आज कितीला मिळते?

    दररोज 6 वाजता बदलतो इंधन दर - देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol

    पुढील बातम्या