Home /News /money /

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा तुमच्या शहरातील इंधन दर

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा तुमच्या शहरातील इंधन दर

नव्या रेटनुसार, आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल दर (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे.

    नवी दिल्ली, 10 जानेवारी : सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने (IOCL) आज सोमवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today 10 January 2022) जारी केले आहेत. आज इंधन दरात (Fuel price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील जवळपास एक महिन्यापासून पेट्रोल-डिझेल दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. क्रूड ऑइन स्वस्त झाल्याने इंधन दर कमी होईल असा जाणकारांचा अंदाज होता. परंतु स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी वेटिंग पीरियड वाढतोच आहे. नव्या रेटनुसार, आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल दर (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

    हे वाचा - तुमच्याकडे पॅनकार्ड असल्यास वाचवू शकता 1000 रुपये, फक्त एक काम करावं लागेल?

    देशातील महानगरात काय आहे पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर – चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर – लखनऊमध्ये पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लीटर

    हे वाचा - Reliance ने न्यूयॉर्कमध्ये खरेदी केले 729 कोटीचे Luxury Hotel

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या