मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; पाहा आजचे नवे दर

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; पाहा आजचे नवे दर

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol Diesel Price)उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे ही कपात झाली आहे. यासोबतच अनेक राज्यांतील राज्य सरकारांनीही आपापल्या पातळीवर किमती कमी केल्या आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 15 नोव्हेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवार, 15 नोव्हेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही दरात वाढ झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा कमी दराने मिळत आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारच्या घोषणेपासून इंधनाचे दर जवळपास स्थिर आहेत. काही राज्यांनीही किमती कमी केल्या केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे ही कपात झाली आहे. यासोबतच अनेक राज्यांतील राज्य सरकारांनीही आपापल्या पातळीवर किमती कमी केल्या आहेत. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेल 12-12 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर उत्तर प्रदेशसह अनेक शहरांमध्ये इंधन 100 रुपयांच्या खाली आले आहे. आज 15 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल-डिझेलची किंमत >> मुंबई - पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर >> दिल्ली - पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर >> चेन्नई - पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर >> कोलकाता - पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर >> श्रीगंगानगर - पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर दररोज 6 वाजता किंमत बदलते पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. आजच्या नवीन किंमती कशा जाणून घ्याल तुम्ही SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे दैनंदिन दर जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर RSP आणि 9223112222 या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
First published:

Tags: Petrol and diesel, Petrol Diesel hike

पुढील बातम्या