• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: आज चौथ्या दिवशी डिझेल दरात पुन्हा वाढ, इथे तपासा तुमच्या शहरातील रेट

Petrol-Diesel Price Today: आज चौथ्या दिवशी डिझेल दरात पुन्हा वाढ, इथे तपासा तुमच्या शहरातील रेट

मागील चार दिवसांत डिझेलचा भाव 70 पैशांनी वाढला आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलचा दर रेकॉर्ड स्तरावर आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी डिझेल दरात वाढ (Diesel Price Today) करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात 25 पैशांची वाढ केली आहे. तर पेट्रोलचा दर स्थिर आहे. मागील चार दिवसांत डिझेलचा भाव 70 पैशांनी वाढला आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलचा दर रेकॉर्ड स्तरावर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननुसार (IOCL), राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज सोमवारी पेट्रोल (Petrol Price Today) सलग 22व्या दिवशी 101.19 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहे. तर डिझेल रेट 25 पैसे प्रति लीटर वाढीसह 89.32 रुपये प्रति लीटर आहे. 4 दिवसांत डिझेल दरात 3 वेळा वाढ - देशभरात मागील 4 दिवसांत डिझेल दरात 3 वेळा वाढ झाली आहे. या तीन दिवसांत डिझेल दरात 70 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी नुकतंच 24 सप्टेंबर रोजी 20 पैसे, तर 26 सप्टेंबरला 25 पैसे वाढ केली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबरला पुन्हा 25 पैशांची वाढ झाली आहे.

    महत्त्वाचे: Aadhaar Card च्या साहाय्याने मिळवा पर्सनल लोन, फॉलो करा या स्टेप्स

    चार महानगरातील पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Price on 27 September 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 89.32 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.94 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.93 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 101.62 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लीटर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published: