नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : डिझेलच्या दरात आज रविवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर स्थिर आहेत. डिझेलचे दर 25 पैसे ते 27 पैशांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. शनिवारी किंमती स्थिर होत्या. शुक्रवारीही डिझेल दरात (Diesel Price Today) 22 पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली होती.
IOCL वेबसाइटनुसार, आज रविवारी दिल्लीत पेट्रोल भाव 101.19 रुपये आहे. तर डिझेल दर 89.07 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 107.26 रुपये आणि डिझेलचा भाव 96.68 रुपये प्रति लीटर आहे. IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर SMS द्वारे आपल्या शहरात पेट्रोल-डिझेल भाव तपासता येतात.
पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं, की देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होत नाहीत, कारण राज्य इंधन GST कक्षेत आणू इच्छित नाहीत.
वस्तू आणि सेवा कर अर्थात GST काउंसिलची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की 'पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. महसुलाशी निगडित अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागेल. बैठकीत यावर चर्चा झाली नाही'
>> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 89.07 रुपये प्रति लीटर
>> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.68 रुपये प्रति लीटर
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.69 रुपये प्रति लीटर
>> कोलकातामध्ये पेट्रोल 101.62 रुपये आणि डिझेल 92.17 रुपये प्रति लीटर
देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.