Home /News /money /

Petrol Price Today: इंधन दरात आज कोणताही बदल नाही, तपासा मुंबईतील पेट्रोल-डिझेल भाव

Petrol Price Today: इंधन दरात आज कोणताही बदल नाही, तपासा मुंबईतील पेट्रोल-डिझेल भाव

File Photo

File Photo

राजधानी दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये आहे.

    नवी दिल्ली, 27 जानेवारी : आयओसीएलने आज गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price Today, 27 January 2022) दर जारी केले आहेत. आज किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. राजधानी दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये आहे. सध्या नोव्हेंबर महिन्यापासून दर वाढले नसले, तरी अद्यापही पेट्रोल भाव 100 रुपयांवर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा इंधनासाठी मोठी रक्कम द्यावी लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) सतत चढ-उतार होत आहेत. इंधन दरात 4 नोव्हेंबर 2021 पासून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपयांची आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये प्रति लीटरची कपात केली होती.

    हे वाचा - Zomato चे शेअर मोठ्या घसरणीनंतर 9 टक्के वाढले, आता गुंतवणूक करावी का?

    महाराष्ट्रातील आजचा दर (Today's Petrol and Diesel Prices in Maharashtra)-
    पुणे109.45 रुपये92.25 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
    नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
    अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
    औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
    रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
    रायगड109.48 रुपये92.25 रुपये
    परभणी112.49 रुपये95.17 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली110.03 रुपये92.83 रुपये
    कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये
    देशात प्रमुख शहरात आजचा भाव - – दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर – लखनऊत पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लीटर असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    हे वाचा - Zomato चे शेअर्स पडल्यानंतरही CEO म्हणाले- 'मी या घसरणीची वाट पाहत होतो'

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या