Home /News /money /

Petrol Diesel Prices Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेल दरात काय झाले बदल, तपासा नवे दर

Petrol Diesel Prices Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेल दरात काय झाले बदल, तपासा नवे दर

सरकारी ते कंपन्यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Prices) जारी केले आहेत.

    नवी दिल्ली, 21 मार्च : सरकारी ते कंपन्यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Prices) जारी केले आहेत. आजही चेन्नई, मुंबई, दिल्लीत इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. पण लहान शहरांत दर बजलले आहेत. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात (Diesel Price Hike) प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहकांना विकले जाणारे डिझेल प्रतिलिटर 25 रुपयांनी महागलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, पेट्रोल पंपांवरून विकल्या जाणाऱ्या डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही. उत्पादन शुल्कात कपात करण्याआधी इंधन दर सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. अनेक शहरांत पेट्रोल दर 100 रुपयांवर पोहोचला होता. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलमध्ये चढ-उतार असतानाही देशात पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहे.

    हे वाचा - दररोज 20 रुपये गुंतवून तुम्ही होऊ शकता कोट्यधीश! जाणून घ्या काय आहे त्याचे सूत्र

    पुणे109.45 रुपये92.25 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    नाशिक109.49 रुपये92.29 रुपये
    नागपूर109.71 रुपये92.53 रुपये
    अहमदनगर110.15 रुपये92.92 रुपये
    औरंगाबाद110.38 रुपये93.14 रुपये
    रत्नागिरी110.97 रुपये93.68 रुपये
    रायगड109.48 रुपये92.25 रुपये
    परभणी112.49 रुपये95.17 रुपये
    पालघर109.75 रुपये92.51 रुपये
    सांगली110.03 रुपये92.83 रुपये
    कोल्हापूर110.09 रुपये92.89 रुपये
    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

    हे वाचा - Diesel Price Hike: घाऊक डिझेलच्या दरात लिटरमागे 25 रुपयांची वाढ! महाराष्ट्रातील दर जाणून घ्या

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या