पेट्रोल-डीझेल झाले स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

Petrol, Diesel - पेट्रोल डीझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. या दराचे अपडेट मोबाईलवरही मिळवता येतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2019 10:28 AM IST

पेट्रोल-डीझेल झाले स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : रविवारी पेट्रोल डीझेलचे दर घसरले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 9 पैशांनी तर डीझेलचा दर 15 पैशांनी कमी झाला आहे. यानंतर पेट्रोलचा दर 71 रुपये 99 पैसे तर डीझेलचा तर 65 रुपये 49 पैसे इतका झाला आहे. कोलकत्त्यात पेट्रोल 74 रुपये 65 पैसे आणि डीझेल 67 रुपये 87 पैसे आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 77 रुपये 65 पैसे तर डीझेल 68 रुपये 66 पैसे दराने मिळत आहे.

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं. पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

स्वत:च चेक करा पेट्रोल डीझेलचे दर

Loading...

ग्राहकांना स्वत: पेट्रोल-डीझेलचे दर चेक करता येतात. यासाठी एका विशेष नोंदणीकृत नंबरवर मेसेज पाठवून अपडेट मिळवता येतात. त्यात सध्याच्या इंधन दराची माहिती मिळते. एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंप चालकाकडून डीलर कोड घ्यावा लागेल. इंडियन ऑईल ग्राहकांना RSP<डीलर कोड> हा मेसेज 92249 9 2249 या क्रमांकावर तर बीपीसीएल ग्राहकांना

VIDEO: वर्दीतल्या देवदूताला कडक सॅल्यूट! पूर आणि वादळातही 2 चिमुकलींंना घेऊन 'तो' चालत राहिला...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...