मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Price Today: सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दर चढेच, जाणून घ्या तुमच्या शहरातील 1 लीटरचा भाव

Petrol Price Today: सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दर चढेच, जाणून घ्या तुमच्या शहरातील 1 लीटरचा भाव

रविवारी इंधन दरात झालेल्या घसरणीनंतर आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

रविवारी इंधन दरात झालेल्या घसरणीनंतर आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

रविवारी इंधन दरात झालेल्या घसरणीनंतर आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : घरगुती तेल कंपन्यांनी 9 सप्टेंबर 2021 रोजी पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती (Petrol Diesel Price on 9th September 2021) जारी केल्या आहेत. आज इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रविवारी इंधन दरात झालेल्या घसरणीनंतर आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. रविवारी देशातील वेगवेगळ्या शहरांत 10 पैसे ते 15 पैशांपर्यंत पेट्रोल दरात कपात झाली होती.

IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले जातात. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा SMS द्वारे आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता.

पेट्रोल डिझेल दर (Petrol Diesel Price on 9th September 2021) -

>> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर

>> मुंबईत पेट्रोलचा दर 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर

>> चेन्नईत पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर

>> कोलकातामध्ये पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर

>> नोएडात पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर

>> जयपुरमध्ये पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर

>> भोपाळमध्ये पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर

सोन्याच्या दरात घसरण सुरूच! आज 10000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price