• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: आजचे दर जारी, जाणून घ्या मुंबईतील लेटेस्ट पेट्रोल-डिझेल भाव

Petrol Price Today: आजचे दर जारी, जाणून घ्या मुंबईतील लेटेस्ट पेट्रोल-डिझेल भाव

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. 5 सप्टेंबर रोजी इंधन दरात बदल करण्यात आले होते. त्यानंतर दर स्थिर आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : आज आठड्याच्या सुरुवातीला सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जारी केले गेले आहेत. आज इंधन दरात कोणतेही बदल केले गेले नाहीत. सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. 5 सप्टेंबर रोजी इंधन दरात बदल करण्यात आले होते. त्यानंतर दर स्थिर आहेत. 5 सप्टेंबरला दरात 15 पैसे प्रति लीटरची कपात करण्यात आली होती. IOCL नुसार, देशाची राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 101.19 रुपये आणि डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लीटर आहे. IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा SMS द्वारे तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासू शकता.

    पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Price on 13 September 2021) -

    >> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडात पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपुरमध्ये पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळमध्ये पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर

    नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी, PF Account चं हे काम करा लगेच, अन्यथा येईल समस्या

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published: