4 दिवसांनी पेट्रोल झालं महाग, 'या' आहेत आजच्या किमती

4 दिवसांनी पेट्रोल झालं महाग, 'या' आहेत आजच्या किमती

Petrol, diesel - 4 दिवसांनी पेट्रोलचे दर वाढले,डिझेलचे भाव स्थिर आहेत. जाणून घ्या नवे दर

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : आज पेट्रोलच्या दरात 4 दिवसांनी बदल झालाय. अगोदर 4 दिवस पेट्रोलच्या किमती स्थिर झाल्या होत्या. 11व्या दिवशी डिझेलच्या दरात काही बदल झालेला नाही. आज मंगळवारी ( 23 जुलै ) दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथे पेट्रोलच्या किमतीत 6 पैसे प्रति लीटर वाढ झालीय. तर कोलकत्तामध्ये पेट्रोलमध्ये  10 पैसे प्रति लीटर वाढ झालीय.

मध्य पूर्वेत असलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वद्धी पाहायला मिळाली. आखाती देशातल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती जास्त वाढल्या.

कर्नाटकात राजकीय नाट्य सुरूच! आज होणार फैसला, विश्वासदर्शक ठरावावर 6 वाजता मतदान

पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज ( 23 जुलै ) दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 73.41 रुपये, 79.02 रुपये, 75.87 रुपये आणि 76.24 रुपये प्रति लीटर आहेत. चारही महानगरांमध्ये डिझेलचे दर क्रमश: 66.24 रुपये, 69.43 रुपये, 68.31 रुपये आणि 69.96 रुपये प्रति लीटर आहे.

World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

असे पाहा पेट्रोलचे दर

पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल  RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो.

या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल - डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत.

Facebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक!

याशिवाय ऑइल कंपन्यांच्या वेबसाइट्स आहेत. इंडियन ऑयलचीवेबसाइट www.iocl.com, बीपीसीएलची वेबसाइट www.bharatpetroleum.com, एचपीसीएलची  www.hindustanpetroleum.com इथेही तुम्हाला रोजचे दर कळू शकतात.

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

VIDEO: चंद्रकांत पाटलांनी 'हा' बालिशपणा सोडून द्यावा; धनंजय मुंडेंचा टोला

Published by: Sonali Deshpande
First published: July 23, 2019, 10:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading