मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price Today: सामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत का आजचे इंधनाचे भाव? वाचा इथे

Petrol-Diesel Price Today: सामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत का आजचे इंधनाचे भाव? वाचा इथे

दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर (Petrol Diesel Price Today) आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Fuel Price on 25th December) जारी केले आहेत.

    नवी दिल्ली, 25 डिसेंबर: दिवाळीपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर (Petrol Diesel Price Today) आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Fuel Price on 25th December) जारी केले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अर्थात पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. दिल्लीमध्ये 1 लीटर पेट्रोलचा भाव 95.41 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. सध्या देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये मिळत आहे. याठिकाणी पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटरवर आहे. देशातील महानगरांबाबत बोलायचे झाल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल दिल्लीत मिळत आहे. हे वाचा-Google ला झटका! भरावा लागणार 9.8 कोटी डॉलरचा दंड, वाचा काय आहे कारण दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते आजचे इंधनाचे दर
    शहरपेट्रोलचा भाव (प्रति लीटर)डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    दिल्ली95.41 रुपये86.67 रुपये
    मुंबई109.98 रुपये94.14 रुपये
    चेन्नई101.40 रुपये91.43 रुपये
    कोलकाता104.67 रुपये89.79 रुपये
    श्रीगंगानगर114.01 रुपये98.39 रुपये
    लखनऊ95.28 रुपये86.80 रुपये
    पोर्ट ब्लेअर82.96 रुपये89.33 रुपये
    गांधीनगर95.35 रुपये89.33 रुपये
    अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-सिलेंडर अपघात झाल्यास मिळेल 50 लाखांची नुकसान भरपाई, वाचा कसा कराल क्लेम? इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या