• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या काय आहेत आजचे इंधनाचे भाव

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या काय आहेत आजचे इंधनाचे भाव

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे शनिवारी 21 ऑगस्ट रोजी इंधनाचे भाव (petrol diesel rates on 21 august) स्थिर आहेत. दरम्यान गेले तीन दिवस डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. पेट्रोलचे दर मात्र महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून स्थिर आहेत. डिझेलचे दर शुक्रवारी 20 पैशांपर्यंत कमी झाले आहेत. दरम्यान त्यामुळे गेल्या तीन दिवसात 60 पैशांपर्यंतची घसरण डिझेलच्या किंमतीत झाली होती. आज पुन्हा डिझेलचे दर स्थिर आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price in Mumbai) 107.83 रुपये आणि डिझेलचे दर (Diesel Price in Mumbai) 96.84 रुपये प्रति लीटर आहेत. जुलैमध्ये बदलले होते पेट्रोलचे दर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता रिव्हाइज करता येतात. पेट्रोलच्या दरात शेवटची वाढ 17 जुलै 2021 रोजी झाली होती. अर्थात महिनाभरापेक्षा पण जास्त कालावधीत पेट्रोलचे दर बदलले नाही आहेत. 17 जुलै रोजी देखील पेट्रोलचे दर 30 पैशांनी वधारले होते. पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव >> दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.27 रुपये प्रति लीटर >> मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 96.84 रुपये प्रति लीटर >> चेन्नई - पेट्रोल 101.47 रुपये आणि डिझेल 93.84 रुपये प्रति लीटर हे वाचा-नोकरदारांसाठी Good News! वाढू शकते निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम >> कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 92.32 रुपये प्रति लीटर >> बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 94.65 रुपये प्रति लीटर >> लखनऊ -पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 89.61 रुपये प्रति लीटर अशाप्रकारे तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-कधी पाहिलं आहे का तरंगणारं ATM? ग्राहकांसाठी SBI ने सुरू केली ही खास सेवा तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: