Home /News /money /

Petrol Rates Today: इंधनाचे आजचे दर सामान्यांना परवडणारे आहेत का? पाहा लेटेस्ट भाव

Petrol Rates Today: इंधनाचे आजचे दर सामान्यांना परवडणारे आहेत का? पाहा लेटेस्ट भाव

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात इंधनाच्या दरांमध्येमोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Today) स्थिर आहेत. आजही 09 डिसेंबर रोजी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 09 डिसेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Fuel Price on 09th December) जारी केले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अर्थात पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. मात्र जरी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नसले तरीही आजचे दर सामान्यांच्या खिशाला चाप बसवणारेच आहेत.मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात इंधनाच्या दरांमध्येमोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price Today) स्थिर आहेत. आजही 09 डिसेंबर रोजी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली आहे कारण केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील वॅटमध्ये कपात (Kejriwal Government slashes vat on petrol) करण्यााच निर्णय घेतला. परिणामी दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीमध्ये 1 लीटर पेट्रोलचा भाव 95.41 रुपये प्रति लीटर आहे. हे वाचा- फिनटेक कंपन्यांकडून कर्ज घेताय? मग 'ही' काळजी घ्या अन्यथा होईल पश्चाताप आजचे इंधनाचे दर
    शहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    दिल्ली 95.41 रुपये 86.67 रुपये
    मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
    चेन्नई 101.40 रुपये 91.43 रुपये
    कोलकाता 104.67 रुपये 89.79 रुपये
    श्रीगंगानगर 114.01 रुपये 98.39 रुपये
    लखनऊ 95.28 रुपये 86.80 रुपये
    पोर्ट ब्लेअर 82.96 रुपये 89.33 रुपये
    गांधीनगर 95.35 रुपये 89.33 रुपये
    दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते हे वाचा-आता Internet शिवाय UPI Payments करता येणार! रिझर्व्ह बँकेकडून धोरण जाहीर अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या