Home /News /money /

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रात काय आहेत इंधनाचे दर, एका क्लिकवर वाचा पेट्रोल-डिझेलचा लेटेस्ट भाव

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रात काय आहेत इंधनाचे दर, एका क्लिकवर वाचा पेट्रोल-डिझेलचा लेटेस्ट भाव

पेट्रोल-डिझेलच्या दरात (Fuel Price on 28th December) आजही सरकारी तेल कंपन्यांनी कोणतेही बदल केलेले नाहीत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे.

    मुंबई, 28 डिसेंबर: पेट्रोल-डिझेलच्या दरात (Fuel Price on 28th December) आजही सरकारी तेल कंपन्यांनी कोणतेही बदल केलेले नाहीत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. दिल्लीमध्ये 1 लीटर पेट्रोलचा भाव 95.41 रुपये प्रति लीटर आहे. तर दिल्लीत डिझेल 86.67 रुपये प्रति लीटरवर आहे. केवळ महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर आज महाराष्ट्रातील इतर शहरातही इंधनाचे दर स्थिर आहेत, त्यात कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
    शहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे 110.19 रुपये 92.95 रुपये
    मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
    नाशिक 109.86 रुपये 92.64 रुपये
    नागपूर 109.74 रुपये 92.55 रुपये
    अहमदनगर 110.80 रुपये 93.55 रुपये
    औरंगाबाद 110.66 रुपये 93.41 रुपये
    रत्नागिरी 112.20 रुपये 94.92 रुपये
    परभणी 112.35 रुपये 95.03 रुपये
    पालघर 109.63 रुपये 92.39 रुपये
    सांगली 109.65 रुपये 92.47 रुपये
    कोल्हापूर 109.69 रुपये 92.50 रुपये
    दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. हे वाचा-वर्षभरात अनेक IPOs मुळे गुंतवणूकदारांची जबरदस्त कमाई; काही दिवसात पैसे दुप्पट अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या