Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल दरांनी तोडले सर्व रेकॉर्ड, 107 रुपये लीटरवर पोहोचले भाव

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल दरांनी तोडले सर्व रेकॉर्ड, 107 रुपये लीटरवर पोहोचले भाव

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. काही शहरं अशी आहेत ज्याठिकाणी पेट्रोलचे दर 107 रुपये प्रति लीटर आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जून: सरकारी तेल कंपन्यांनी (Oil Companies) आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात (Fuel Price) वाढ केली आहे. सातत्याने महाग होणाऱ्य पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे (Petrol-Diesel Price Today) काही शहरात पेट्रोलचे दर 107 रुपये प्रति लीटरच्या जवळपास पोहोचले आहेत. पेट्रोलच्या दरात आज (Petrol Price Today) 25 पैसे प्रति लीटर  इतकी वाढ झाली आहे तर डिझेलच्या (Diesel Price Today) किंमतीत 13 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे.

या शहरात पेट्रोलचे दर 105 रुपयांपलीकडे

>> राज्यातील परभणीमध्ये पेट्रोल 105.16 रुपये आणि डिझेल 95.63 रुपये प्रति लीटर

>> राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 107.79 रुपये आणि डिझेल 100.51 रुपये प्रति लीटर

>> मध्यप्रदेशच्या अनूपनगरमध्ये  पेट्रोल 107.43 रुपये आणि डिझेल 98.43 रुपये प्रति लीटर

>> रीवामध्ये पेट्रोल 107.07 रुपये आणि डिझेल 98.10 रुपये प्रति लीटर

>> भोपाळमध्ये पेट्रोल 104.85 रुपये आणि डिझेल 96.05 रुपये प्रति लीटर

हे वाचा-शेतकऱ्यांसाठी खूशखबर! मोदी सरकार देत आहे 4000 रुपये मिळवण्याची संधी,वाचा सविस्तर

महानगरातील पेट्रोलचे दर

>> दिल्लीमध्ये पेट्रोल 96.66 रुपये आणि डिझेल 87.41 रुपये प्रति लीटर

>> मुंबईमध्ये पेट्रोल 102.85 रुपये आणि डिझेल 94.84 रुपये

>> कोलकातामध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 90.25 रुपये

>> चेन्नईमध्ये पेट्रोल 97.91 रुपये आणि डिझेल 92.04 रुपये

दररोज 6 वाजता बदलते पेट्रोल-डिझेलची किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

हे वाचा-1 वर्षाच्या FD वर या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, वाचा काय आहेत इंटरेस्ट रेट्स

कसे तपासाल पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 16, 2021, 10:52 AM IST

ताज्या बातम्या