मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पेट्रोल दरवाढीचा भडका, मुंबईकरांना लिटरमागे मोजावे लागणार 90 रुपये

पेट्रोल दरवाढीचा भडका, मुंबईकरांना लिटरमागे मोजावे लागणार 90 रुपये

लग्नसराईचे दिवस या काळात पेट्रोल-डिझेलची मोठी वाढ झाल्यामुळे खिशाला चांगलाच जाळ लागायची वेळ आली आहे.

लग्नसराईचे दिवस या काळात पेट्रोल-डिझेलची मोठी वाढ झाल्यामुळे खिशाला चांगलाच जाळ लागायची वेळ आली आहे.

लग्नसराईचे दिवस या काळात पेट्रोल-डिझेलची मोठी वाढ झाल्यामुळे खिशाला चांगलाच जाळ लागायची वेळ आली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 07 डिसेंबर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामध्ये लग्नसराईचे दिवस या काळात पेट्रोल-डिझेलची मोठी वाढ झाल्यामुळे खिशाला चांगलाच जाळ लागायची वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर वाढल्यानं इंधनाचे दर देखील दिवसेंदिवस गगनाला पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल 83.71 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 73.83 रुपये लिटर आहे. मुंबईकरांना लिटरमागे पेट्रोलसाठी 90 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत पेट्रोल 90.34 तर डिझेल 80.51 रुपये प्रतिलिटर दर आहे. कोलकाता इथे पेट्रोल 85.19 रुपये लिटर तर चेन्नईमध्ये 77.44 रुपये लिटर पेट्रोलचे दर आहेत. आधीच कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल दरवाढ झाल्यानं नागरिक हैराण झाले होते आता तर कंबरडं मोडण्याची वेळ आली आहे. पेट्रोलियम निर्यात देशांच्या संघटनेने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर इंधनाच्या किंमती स्थिर होतील, असा विश्वास रविंद्र धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी व्यक्त केला. प्रधान म्हणाले, "ओपेकने दोन दिवस अगोदर निर्णय घेतला आहे की यामुळे दररोज पाच लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन वाढेल. आपल्याला याचा फायदा होईल आणि असा अंदाज आहे की येत्या काळात इंधनाच्या किंमती स्थिर राहातील. हे वाचा- Amazon ला मोठा दणका, कंपनीतील गैरव्यवहाराविरोधात व्यापारी संघटनांची EDकडे तक्रार सकाळी 6 वाजता ठरतात दर सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो. असे पाहा पेट्रोलचे दर पेट्रोलचे दर जाणून घेण्यासाठी SMS करता येतो. इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर मेसेज करू शकतो. बीपीसीएल RSP-डीलर कोड- 9223112222 वर मेसेज करू शकतो. एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 इथे मेसेज करू शकतो. या ऑइल कंपन्यांचे अॅपही आहेत. त्यामार्फतही पेट्रोल - डिझेलचे भाव कळू शकतात. इंडियन ऑयलचं Fuel@IOC, बीपीसीएल ग्राहक SmartDrive अॅप, तर एचपीसीएलचं My HPCL अशी अॅप्स आहेत. याशिवाय ऑइल कंपन्यांच्या वेबसाइट्स आहेत. इंडियन ऑयलचीवेबसाइट www.iocl.com, बीपीसीएलची वेबसाइट www.bharatpetroleum.com, एचपीसीएलची www.hindustanpetroleum.com इथेही तुम्हाला रोजचे दर कळू शकतात.
First published:

Tags: Petrol, Petrol and diesel

पुढील बातम्या