• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price today: सर्वसामान्यांना फटका, आज पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा किती वाढले दर

Petrol-Diesel Price today: सर्वसामान्यांना फटका, आज पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा किती वाढले दर

सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. आज गुरुवारी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price) दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा सर्वसामान्यांना झटका दिला आहे. आज गुरुवारी पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price) दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोल दर 35 पैसे, तर डिझेलही 35 पैशांनी महागलं आहे. या वाढीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 104.79 रुपये, तर डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर झालं आहे. सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेल किंमतीत सतत वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून इंधन दर चढाच आहे. या महिन्यात केवळ 10 दिवसांत पेट्रोल दर 2.80 रुपयांनी महागलं आहे, तर डिझेल दरात 3.30 रुपये वाढ झाली आहे. चार महानगरातील पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 14 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 104.79 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 110.75 रुपये आणि डिझेल 101.40 रुपये प्रति लीटर >> चेन्नईत पेट्रोल 102.10 रुपये आणि डिझेल 97.93 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 105.43 रुपये आणि डिझेल 96.63 रुपये प्रति लीटर

    सणासुदीच्या काळात तेल होणार स्वस्त; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

    देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published: