• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल दरात सलग चौथ्या दिवशी वाढ, इथे तपासा तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल दरात सलग चौथ्या दिवशी वाढ, इथे तपासा तुमच्या शहरातील भाव

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price Today) सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. वाढत्या दरांमुळे देशात इंधनाचे दर नव्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price Today) सलग चौथ्या दिवशी वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज रविवारी 3 ऑक्टोबर रोजी पेट्रोल दरात 25 पैसे प्रति लीटर आणि डिझेल दरात 30 पैसे प्रति लीटरची वाढ केली आहे. वाढत्या दरांमुळे देशात इंधनाचे दर नव्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 102.39 रुपये, तर डिझेलचा दर 90.77 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 108.43 रुपये आणि डिझेल 98.48 रुपये प्रति लीटर आहे. IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर SMS द्वारे आपल्या शहरात पेट्रोल-डिझेल भाव तपासता येतात. या राज्यात पेट्रोल 100 पार - देशभरात जवळपास 19 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे.

    SIPमध्ये कशी कराल गुंतवणूक? असं प्लॅनिंग केल्यास तयार होईल 10.19 कोटींचा फंड

    चार महानगरातील पेट्रोल डिझेल रेट (Petrol Diesel Price on 03 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 102.39 रुपये आणि डिझेल 90.77 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 108.43 रुपये आणि डिझेल 98.48 रुपये प्रति लीटर >> चेन्नईत पेट्रोल 100.01 रुपये आणि डिझेल 95.31 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 103.07 रुपये आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लीटर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published: