Petrol-Diesel Price Today: इंधनाचा भडका! मुंबईमध्ये पेट्रोल 102 रुपये लीटर, किंमतींनी गाठला उच्चांक

Petrol-Diesel Price Today: इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत, परिणामी बहुतांश शहरात किंमती सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 102 रुपये आहेत तर काही शहरात हा टप्पाही पार झाला आहे.

Petrol-Diesel Price Today: इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत, परिणामी बहुतांश शहरात किंमती सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 102 रुपये आहेत तर काही शहरात हा टप्पाही पार झाला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 09 जून: इंधनाचे दर (Petrol-Diesel Price Today) सातत्याने वाढत आहेत, परिणामी बहुतांश शहरात किंमती सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे (Petrol-Diesel Price in Mumbai) दर प्रति लीटर 102 रुपये आहेत तर काही शहरात हा टप्पाही पार झाला आहे.  सरकारी तेल कंपन्यांनी एका दिवसानंतर पुन्हा एकदा इंधनाच्या दरात (Fuel Price) वाढ केली आहे. आज पेट्रोलचे दर 25 पैसे प्रति लीटर तर डिझेलचेही दर प्रति लीटर 25 पैशांनी वधारले आहेत. सोमवारी पेट्रोलचे दर 24-28 पैसे प्रति लीटरने वधारले होते तर डिझेलच्या दरात 26-28 पैसे प्रति लीटरने वाढ झाली होती. मे महिन्यात सातत्याने इंधनाचे दर वाढले आहेत. गेल्या 21 दिवसात पेट्रोलचे दर 4.99 रुपये प्रति लीटरने महागलं आहे. तर डिझेलचे भाव 5.44 रुपये प्रति लीटरने महागले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे इंधनाचा भाव (Petrol-Diesel Price Today on 9 June 2021) >> दिल्ली - 95.56 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.47 रुपये प्रति लीटर >> मुंबई - 101.76 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.85 रुपये प्रति लीटर >> कोलकाता - 95.52 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.32 रुपये प्रति लीटर >> चेन्‍नई - 96.94 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 91.15 रुपये प्रति लीटर हे वाचा-स्पेशल FD स्कीम लवकरच संपणार! या चार बँका देतायंत विशेष ऑफर,मिळेल अतिरिक्त व्याज >> जयपूर - 102.14 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.37 रुपये प्रति लीटर >> बेंगळुरु - 98.75 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 91.67 रुपये प्रति लीटर >> नोएडा - 92.91 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.95 रुपये प्रति लीटर >> भोपाळ - 103.71 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.05 रुपये प्रति लीटर >> श्रीगंगानगर - 106.64 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 99.50 रुपये प्रति लीटर >> रीवा - 105.93 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.11 रुपये प्रति लीटर रोज सकाळी सहा वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात. हे वाचा-RBI ने बँक ऑफ इंडियाला ठोठावला 4 कोटींचा दंड, BOI चे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.  
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: