नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात (Petrol Diesel Price Today) वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत डिझेल 90 रुपयांवर पोहोचलं आहे. तर पेट्रोल 102 रुपयांच्या जवळपास आहे. सध्या देशातील जवळपास सर्वच शहरांत पेट्रोल-डिझेल रेट ऑल टाइम हायवर आहेत. मुंबईत आज पेट्रोल दर जवळपास 25 पैसे, तर डिझेल 30 पैशांनी महागलं आहे.
काल 30 सप्टेंबर रोजी गुरुवारी पेट्रोल दरात 25 रुपये प्रति लीटर वाढ करण्यात आली होती. तर डिझेल दरात 30 पैसे प्रति लीटर वाढ झाली होती. बुधवारी किंमती स्थिर होत्या. त्याआधी मंगळवारी देखील पेट्रोल दर 20 पैशांनी वाढवला होता. तर डिझेल 25 पैशांनी महागलं होतं.
>> दिल्लीत पेट्रोल 101.89 रुपये आणि डिझेल 90.17 रुपये प्रति लीटर
>> मुंबईत पेट्रोल 107.95 रुपये आणि डिझेल 97.84 रुपये प्रति लीटर
>> चेन्नईत पेट्रोल 99.58 रुपये आणि डिझेल 94.74 रुपये प्रति लीटर
>> कोलकातामध्ये पेट्रोल 102.47 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लीटर
8 दिवसांत 6 वेळा डिझेल दरात वाढ -
देशभरात मागील 8 दिवसांत डिझेल दरात 6 वेळा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी 24 सप्टेंबर रोजी 20 पैसे, तर 26 सप्टेंबरला 25 पैसे वाढ केली होती. 27 सप्टेंबरला पुन्हा 25 पैशांची वाढ झाली. त्यानंतर 28 सप्टेंबरला पुन्हा 25 पैशांची वाढ करण्यात आली. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी डिझेल दरात 30 पैसे प्रति लीटरची वाढ झाली. आज पुन्हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी 1 तारखेला डिझेल दरात मुंबईत 30 पैसे वाढ झाली आहे.
आणखी वाढू शकतो पेट्रोल-डिझेल दर -
आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल दरात सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती तीन वर्षांत पहिल्यांदा 80 डॉलर प्रति बॅरल जवळपास पोहोचू शकतात. सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.