Home /News /money /

Petrol-Diesel Price today: आज पुन्हा पेट्रोल-डिझेल किंमतीत वाढ, मागील 10 दिवसांत इतकं महागलं इंधन

Petrol-Diesel Price today: आज पुन्हा पेट्रोल-डिझेल किंमतीत वाढ, मागील 10 दिवसांत इतकं महागलं इंधन

सप्टेंबरपासून सुरू असलेली इंधन वाढ ऑक्टोबर महिन्यातही कायम आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल किंमतीत वाढ केली आहे.

    नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : मागील कित्येक दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढ (Petrol-Diesel Price) सुरूच आहे. सप्टेंबरपासून सुरू असलेली इंधन वाढ ऑक्टोबर महिन्यातही कायम आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल किंमतीत वाढ केली आहे. आज पेट्रोल 30 पैसे प्रति लीटर तर डिझेल 35 पैसे प्रति लीटरने महागलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसांत पेट्रोल दर 2.80 रुपयांनी वाढला आहे. तर डिझेल दरात 3.30 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. चार महानगरात पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 11 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपये आणि डिझेल 93.18 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 110.41 रुपये आणि डिझेल 101.03 रुपये प्रति लीटर >> चेन्नईत पेट्रोल 101.79 रुपये आणि डिझेल 97.59 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 105.09 रुपये आणि डिझेल 96.28 रुपये प्रति लीटर देशभरात जवळपास 26 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशात पेट्रोल-डिझेल दरात वाढ होत आहे. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Petrol price hike

    पुढील बातम्या