Petrol Diesel Price: इंधनाच्या दरांमध्ये पुन्हा वाढ, मुंबईत पेट्रोल शंभरी गाठण्याची शक्यता

Petrol Diesel Price: इंधनाच्या दरांमध्ये पुन्हा वाढ, मुंबईत पेट्रोल शंभरी गाठण्याची शक्यता

मुंबईत पेट्रोलची किंमत वाढून 97.61 रुपये आणि डिझेलची किंमत 88.82 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली आहे. तर, दिल्लीत पेट्रोलची किंमत 91.27 रुपये तर, डिझेलची किंमत 81.73 रुपयांवर पोहोचली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मे : राज्यातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (petrol and diesel price) आज पुन्हा वाढविल्या आहेत. आज डिझेलच्या किंमतीत 30 ते 35 पैसे वाढ झाली आहे, तर पेट्रोलची किंमत प्रति लीटर 28 ते 30 पैशांनी वाढली आहे. मुंबई (Mumbai Petrol Rate) आणि दिल्लीसह देशातील जवळपास सर्वच राज्यांत पेट्रोलची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत वाढून प्रति लीटर 97.61 रुपये आणि डिझेलची किंमत प्रति लीटर 88.82 रुपये पर्यंत पोहोचली आहे. तर, दिल्लीत पेट्रोलची किंमत 91.27 रुपये तर, डिझेलची किंमत 81.73 रुपयांवर पोहोचली आहे.

आजची पेट्रोल-डिझेलची किंमत (7 मे 2021)

>> दिल्लीत पेट्रोल 91.27 रुपये तर डिझेल 81.73 रुपये प्रति लीटर आहे.

>> मुंबईत पेट्रोल 97.61 आणि डिझेल 88.82 रुपये प्रति लीटर आहे.

>> चेन्नईमध्ये पेट्रोल 93.15 आणि डिझेल प्रतिलिटर 86.65 रुपये प्रति लीटर आहे.

>> नोएडामध्ये पेट्रोल 89.44 रुपये आणि डिझेल 82.18 रुपये प्रति लीटर आहे.

>> भोपाळमध्ये पेट्रोल 99.28 रुपये तर डिझेल 90.01 रुपये प्रति लीटर आहे.

हे वाचा-तुमच्या मुलीसाठी 15 लाखांचं गिफ्ट! पूर्ण करा तिचं 'सुपरगर्ल' होण्याचं स्वप्न

>> लखनऊमध्ये पेट्रोल 89.36  रुपये आणि डिझेल 82.10 रुपये प्रति लीटर आहे.

>> बंगळुरूमध्ये पेट्रोल 94.30 आणि डिझेल 86.64 रुपये प्रति लीटर आहे.

>> चंडीगडमध्ये पेट्रोल 87.80 रुपये तर डिझेल 81.40 रुपये प्रति लीटर आहे.

>> पाटण्यात पेट्रोल 93.52 रुपये तर डिझेल 86.94 रुपये प्रति लीटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी मिळवल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काय आहेत, यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

हे वाचा-गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर 800 रुपयांपर्यंत मिळेल सवलत; असा घ्या संधीचा लाभ

दररोज असे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. हे कोड आपण आयओसीएलच्या वेबसाइटवरून पाहू शकता. तर, आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत आपण बीपीसीएल (BPCL) ग्राहक आरएसपी (RSP) टाईप करून 9223112222 या क्रमांकाला आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.

Published by: News18 Desk
First published: May 7, 2021, 10:34 AM IST

ताज्या बातम्या