• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होत नाहीत कारण... सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होत नाहीत कारण... सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण

पेट्रोलसाठी सामान्य ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. अनेक शहरांत पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी (Minister Hardeep Singh Puri) यांनी यासंदर्भात मोठं विधान केलं आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : गेल्या 18 दिवसांपासून पेट्रोलचे दर (Petrol price) स्थिर आहेत.  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOCL च्या म्हणण्यानुसार, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol diesel price in Delhi) पेट्रोलचा दर 101.19 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लिटर आहे. हे दर आणखी कमी होतील, अशी अपेक्षा गेल्या काही दिवसांपासून व्यक्त होत होती; मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी (Petrolium Minister Hardeep Singh Puri) यांनी मोठं विधान केलं आहे. `राज्य इंधनाला जीएसटीच्या (GST) कक्षेत आणण्यास इच्छुक नसल्यानं पेट्रोल, डिझेलचे दर कमी झालेले नाहीत,` असं पुरी यांनी स्पष्ट केलं. `पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सरकार ज्यादा कर आकारत असल्यानं तिथं पेट्रोलच्या दरानं शंभरी पार केली आहे,` असं पुरी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. पेट्रोलचे दर कमी व्हावेत का, असा तुमचा प्रश्न असेल तर त्यावर `हो` असं उत्तर असल्याचं केंद्रीय मंत्री पुरी यांनी सांगितलं. मग पेट्रोलचे दर कमी का होत नाहीत, असा तुमचा प्रतिप्रश्न असेल तर राज्य (State) या बाबी जीएसटीच्या कक्षेत आणण्यास इच्छुक नाहीत, असं त्यावरचं उत्तर असल्याचं पुरी यांनी सांगितलं. `केंद्र सरकार 32 रुपये प्रति लिटर असा कर पेट्रोलवर आकारते. जेव्हा इंधनाचा दर 19 अमेरिकी डॉलर प्रतिबॅरल होता तेव्हाही आम्ही 32 रुपये प्रति लिटर असा कर घेत होतो आणि आजही तेवढाच कर आकारला जात आहे; मात्र आता इंधनाची किंमत वाढून ती 75 अमेरिकी डॉलर झाली आहे,` असं पुरी यांनी स्पष्ट केलं. मोठी बातमी! आता घरीच मिळणार कोरोना लस; मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय `पेट्रोलवर आकारण्यात येणाऱ्या कराचा वापर कल्याणकारी योजनांसाठी केला जातो. पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारनं जुलैत दर 3.51 रुपयांनी वाढवले, त्यामुळे पेट्रोलचे दर 100 रुपयांवर गेले. पश्चिम बंगालमध्ये एकत्रित कर (Tax) सुमारे 40 टक्के आहे. विधान करणं खूप सोपं आहे,` असं पुरी यांनी सांगितलं. टीएमसी सरकारनं (TMC Government) 3.51 रुपयांनी दर वाढवले नसते, तर आजही पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटरपेक्षा कमी असता, असं पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी बुधवारी (22 सप्टेंबर) भवानीपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कोलकत्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी पेट्रोल दराबाबतची माहिती दिली. या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, भाजपच्या प्रियंका टिबरेवाल आणि माकपचे श्रीजीब विश्वास यांच्यात जागा निवडणूक रंगत आहे.
First published: