• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: रक्षाबंधनाच्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात कमी, जाणून घ्या मुंबईतील आजचा भाव

Petrol-Diesel Price Today: रक्षाबंधनाच्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात कमी, जाणून घ्या मुंबईतील आजचा भाव

सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. आज पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Today) दोन्ही इंधनाच्या किमती कमी झाल्या आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan 2021) दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. आज पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Today) दोन्ही इंधनाच्या किमती कमी झाल्या आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 20 पैसे प्रति लीटरपर्यंत कमी झाली आहे. तर डिझेलही 20 पैसे प्रति लीटरने स्वस्त झालं आहे. या घसरणीनंतर दिल्लीत 1 लीटर पेट्रोलचा भाव 101.64 रुपये आणि डिझेलचा भाव 89.07 रुपये आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही कच्च्या तेलाचे किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्याने घरगुती बाजारातही इंधनाच्या किमतीत काहीशी घसरण झाली आहे. पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Price on 22 August 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 101.64 रुपये आणि डिझेल 89.07 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोलचा दर 107.66 रुपये आणि डिझेल 96.64 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 99.32 रुपये आणि डिझेल 93.66 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 101.93 रुपये आणि डिझेल 92.13 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 89.64 रुपये प्रति लीटर >> जयपुर पेट्रोल 108.56 रुपये आणि डिझेल 98.22 रुपये प्रति लीटर >> भोपाल पेट्रोल 110.06 रुपये आणि डिझेल 97.88 रुपये प्रति लीटर 19 राज्यात पेट्रोल 100 पार - देशभरात जवळपास 19 राज्यात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोहोचला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख सामिल आहे. त्याशिवाय महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल आधीपासूनच 100 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे.

    केंद्राचा मोठा निर्णय! नोकरी गमावणाऱ्यांना 2022 पर्यंत मिळणार PF, वाचा सविस्तर

    असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर - पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएसच्या (SMS) माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर हा कोड मिळेल.

    2000 च्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात बँकेकडून मिळतील रु., कुठे आणि कशी बदलाल नोट

    दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर - दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.
    Published by:Karishma
    First published: