मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Price Today: इंधन दरवाढीने सर्वसामान्य त्रस्त; आज पुन्हा वाढल्या किंमती

Petrol Price Today: इंधन दरवाढीने सर्वसामान्य त्रस्त; आज पुन्हा वाढल्या किंमती

IOCL ने जारी केलेल्या नव्या रेटनुसार आज पेट्रोल दर 58 पैसे आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटरने वाढलं आहे.

IOCL ने जारी केलेल्या नव्या रेटनुसार आज पेट्रोल दर 58 पैसे आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटरने वाढलं आहे.

IOCL ने जारी केलेल्या नव्या रेटनुसार आज पेट्रोल दर 58 पैसे आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटरने वाढलं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेल (petrol diesel hike) दरात तेजी कायम आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज बुधवारी पुन्हा पेट्रोल-डिझेल दर वाढवले आहेत. IOCL ने जारी केलेल्या नव्या रेटनुसार आज पेट्रोल दर 58 पैसे आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटरने वाढलं आहे. दिल्लीत आज बुधवारी पेट्रोल 107.94 प्रति लीटरवर पोहोचलं आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचलं आहे.

केवळ ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल 5.3 रुपये, तर डिझेल 5.35 रुपयांनी महागलं आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी असल्याने पेट्रोल-डिझेलचा भाव सतत वाढतो आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 21 वेळा इंधन दरवाढ झाली आहे. केवळ पाच दिवस सोडून संपूर्ण महिन्याभर पेट्रोल-डिझेल दर वाढले आहेत.

Price Hike : दिवाळीनंतर एसी, टीव्ही, फ्रीजही महागणार

चार महानगरांमध्ये पेट्रोल डिझेल दर (Petrol Diesel Price on 27 October 2021) -

>> दिल्ली पेट्रोल 107.94 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 113.80 रुपये आणि डिझेल 104.75 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 104.83 रुपये आणि डिझेल 100.92 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता पेट्रोल 108.45 रुपये आणि डिझेल 99.78 रुपये प्रति लीटर

भारतातील पहिला 'स्किल इम्पॅक्ट बॉण्ड' लॉन्च; 50 हजार तरुणांना होणार फायदा

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

First published:

Tags: Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike, Petrol price hike