मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यानंतरही घरगुती बाजारात पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात आलेले नाहीत.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यानंतरही घरगुती बाजारात पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात आलेले नाहीत.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यानंतरही घरगुती बाजारात पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात आलेले नाहीत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : IOCL ने आज मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today 21 Dec 2021) जारी केले आहेत. आज किमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत मोठी घसरण झाल्यानंतरही घरगुती बाजारात पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात आलेले नाहीत.

नव्या रेटनुसार, आज राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. तर क्रूड ऑइल आंतरराष्ट्रीय बाजारात 72 डॉलर प्रति बॅरलहून खाली गेलं आहे.

काय आहेत पेट्रोल-डिझेल दर -

>> दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर

>> मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर

>> चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर

>> कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

>> लखनऊमध्ये पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लीटर

>> गांधीनगर पेट्रोल 95.35 रुपये आणि डिझेल 89.33 रुपये प्रति लीटर

असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर -

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

Gold Price: सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण, तपासा आजचा लेटेस्ट रेट

दररोज 6 वाजता बदलतात किंमती -

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलतात. सकाळी सहा वाजल्यापासून नवे रेट्स लागू होतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर इंधनाचे दर जवळपास दुप्पट होतात.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price