मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Diesel Rate : 2 राज्यांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, वाचा तुमच्या शहरातले कसे पाहाचे दर

Petrol Diesel Rate : 2 राज्यांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, वाचा तुमच्या शहरातले कसे पाहाचे दर

Petrol, Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल अन् डिझेलचे आजचे दर जाहीर, वाचा सविस्तर

Petrol, Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल अन् डिझेलचे आजचे दर जाहीर, वाचा सविस्तर

सरकारी तेल कंपन्यांनीही बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : जागतिक बाजारपेठेत गेल्या २४ तासांत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. ब्रेंट क्रूड आणि डब्ल्यूटीआय या दोन्हींच्या किंमती प्रति बॅरल सुमारे २ डॉलरने वाढल्या आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

देशातील चार महानगरांमध्ये आज जाहीर झालेल्या दरांमध्ये सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केला नाही. मात्र दोन राज्यांमध्ये तेलाच्या किंमती बदलल्या आहेत. यूपी आणि बिहारसारख्या राज्यांतील शहरांमध्ये तेलाच्या किमती बदलल्या आहेत. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) मध्ये पेट्रोल 15 रुपयांनी स्वस्त झालं. प्रति लीटरसाठी 96.60 रुपये मोजावे लागत आहेत.

डिझेल 16 पैशांनी 89.77 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 10 पैशांनी स्वस्त होऊन 96.47 रुपयांवर पोहोचले, तर डिझेलही 10 पैशांनी घसरून 89.66 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. पटनामध्ये पेट्रोल 14 पैशांनी महाग झालं आहे. पेट्रोलसाठी इथे 107.38 रुपये प्रति लीटरसाठी मोजावे लागत आहेत.

'या' FD मध्ये गुंतवणूक करा आणि 46,800 रुपयांपर्यंत TAX वाचवा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती २ डॉलरने वाढल्या असून ८६.२२ डॉलर प्रति बॅरल झाल्या आहेत. मुंबई, दिल्ली, लखनऊ, कोलकातामध्ये कसे आहेत पेट्रोलचे दर जाणून घेऊया.

- दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

- मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- चेन्नई- पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

- कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. त्यावर टॅक्स आणि एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन वॅट अशा अनेक गोष्टी लागून त्याचे भाव जास्त होत असतात. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. तुम्हाला घसबसल्याही तुमच्या शहरातील दर तपासता येऊ शकतात.

तुम्ही SMSद्वारे पेट्रोल डिझेलचे रोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवला तर माहिती मिळू शकते. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील दर चेक करू शकता.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price