पेट्रोलचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता, आता हे नवं कारण

पेट्रोलचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता, आता हे नवं कारण

ज्या तेलाच्या जहाजावर हल्ला झाला ते जहाज इराणी तेल कंपनी NOIC चं आहे. या स्फोटाच्या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमतीत जोरदार वाढ झाली.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : इराणमध्ये सकाळी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तेलाच्या टँकरला आग लागली. या घटनेनंतर आलेल्या वृत्तानुसार, तेलाच्या टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाला. त्यामुळे हा आगडोंब उसळला.हा स्फोट सौदी अरेबियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ झाला.

ज्या तेलाच्या जहाजावर हल्ला झाला ते जहाज इराणी तेल कंपनी NOIC चं आहे. या स्फोटाच्या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमतीत जोरदार वाढ झाली.कच्च्या तेलाच्या किंमती 58 डॉलर प्रतिबॅरल वरून 60 डॉलर प्रतिबॅरल झाल्या आहेत. भारतासारख्या कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या देशांवर याचा परिणाम होईल. पुढच्या काही दिवसांत पेट्रोलचे दर 2 रुपयांनी वाढू शकतात.

भारत 80 टक्क्यांपेक्षा जास्त कच्चं तेल आयात करतो. त्यामुळे भारतातल्या तेल कंपन्या या आयातीवरच अवलंबून असतात.

(हेही वाचा : 'बँक ऑफ महाराष्ट्र'ची दिवाळी भेट, ग्राहकांना मिळणार ही मोठी सवलत)

मागच्या 15 दिवसांतल्या कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे पेट्रोल-डिझेलचे भाव ठरवले जातात. यानुसार, कच्च्या तेलाच्या किंमती 66 ते 68 प्रतिबॅरल 66 ते 68 डॉलर वर जाऊ शकतात.

सौदी अरेबिया आणि इराणमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. त्यातच इराणी कंपनीच्या टँकरवरचा हा हल्ला क्षेपणास्त्राने करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे.

==========================================================================================

मंत्री होण्यासाठी एकाने 20 कोटी मोजले, अजित पवारांची UNCUT मुलाखत

Published by: Arti Kulkarni
First published: October 11, 2019, 4:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading