Home /News /money /

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी, तुमच्या शहरातील भाव काय?

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी, तुमच्या शहरातील भाव काय?

, क्रूडचे दर प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचले होते. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 111.2 डॉलर होती, जी गेल्या आठवड्यात प्रति बॅरल 119 डॉलरवर पोहोचली होती.

    मुंबई, 4 जुलै : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीतील (Crude Oil) अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन (Petrol Diesel Prices) किरकोळ दर जाहीर केले. महागड्या क्रूडचा दबाव कंपन्यांवर आहे, त्यामुळे देशांतर्गत बाजारातही किंमती वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. कंपन्यांनी 6 एप्रिलपासून त्याच्या किमती वाढवलेल्या नाहीत. दरम्यान, क्रूडचे दर प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचले होते. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 111.2 डॉलर होती, जी गेल्या आठवड्यात प्रति बॅरल 119 डॉलरवर पोहोचली होती. देशातील कोणत्या शहरात घर घेणे सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त, पाहा संपू्र्ण लिस्ट
     राज्यातील प्रमुख शहरांतील दर
    >> मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर >> पुणे - पेट्रोल 111.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.58 रुपये प्रति लीटर >> ठाणे- पेट्रोल 110.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.25 रुपये प्रति लीटर >> नाशिक- पेट्रोल 111.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.70 रुपये प्रति लीट >> नागपूर- पेट्रोल 111.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.14 रुपये प्रति लीटर >> औरंगाबाद- पेट्रोल 111.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.16 रुपये प्रति लीटर >> जळगाव- पेट्रोल 112.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर >> कोल्हापूर- पेट्रोल 111.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.54 रुपये प्रति लीटर सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. बाजारात आता Photo QR ची एन्ट्री! ही फक्त पेमेंट सुविधा नाही तर व्यवसाय वाढवण्याची ट्रीक तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या