मुंबई, 27 जून : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) गेल्या आठवड्यात घसरल्यानंतर पुन्हा वाढत आहेत. ब्रेंट क्रूडचा दर सध्या प्रति बॅरल 111 डॉलरच्या वर जात आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले.
कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये बदल केलेला नाही आणि आजही दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि मुंबईत 111.35 रुपये दराने विकले जात आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 111.3 डॉलरपर्यंत वाढली आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूड 108 डॉलरपर्यंत खाली आले होते. कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे पेट्रोलियम कंपन्यांवरही दबाव वाढत आहे.
नवीन लेबर कोडचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल; पगार कमी होणार की वाढणार?देशातील प्रमुख शहरातील दर काय आहे?
>> मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
>>दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
>> चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
>> कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
घरी बसून पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासायचे असतील तर एक सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून फक्त एक एसएमएस करावा लागेल. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.