Petrol Diesel: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांना विकलं जातंय?
Petrol Diesel: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज किती रुपयांना विकलं जातंय?
2022 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर विकले जात होते.
मुंबई, 26 जून: सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) कोणताही बदल केलेला नाही. गेल्या वेळी 21 मे रोजी केंद्र सरकारच्या उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात करण्याच्या निर्णयानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली होती. केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले होते. सध्या पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त म्हणजे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे.
यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर विकले जात होते.
आता नोकरी मागू नका तर द्या! छोट्या जागेत सुरू करा साबणाचा व्यवसाय, महिन्याला होईल बंपर कमाईदेशातील प्रमुख शहरातील दर काय आहे?
>> मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
>>दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
>> चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
>> कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
>> लखनौ- पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
>> जयपूर - पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
>> पोर्ट ब्लेअर- पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
>> पाटना- पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
>> बंगळुरू - पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
>> चंदीगड- पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
>> हैदराबाद - पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
घराच्या गच्चीचा उपयोग करा बिझनेससाठी, घरबसल्या मिळवा चांगलं उत्पन्नसकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
घरी बसून पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासायचे असतील तर एक सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून फक्त एक एसएमएस करावा लागेल. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.