मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, मुंबईसह तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर पाहा

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात वाढ, मुंबईसह तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर पाहा

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही.

    मुंबई, 20 जुलै : तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर नवे दर जारी केले आहेत. आजही पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही. मात्र कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरुच आहे. गेल्या आठवड्यता शंभर डॉलरच्या खाली आलेले कच्च्या तेलाचे दर आता पुन्हा वर चढू लागले आहेत. आज कच्च्या तेलाचे दर 107 डॉलरवर आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. राज्यात काही दिवसांपू्र्वी नवीन शिंदे-ठाकरे सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करुन नागरिकांना दिलासा दिला होता. राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झालं होतं. डॉलरच्या तुलनेत रुपया का मार खातोय? जगभरात डॉलर मजबूत होण्याचं 'हे' आहे कारण राज्यातील प्रमुख शहरांतील इंधनाचे दर >> मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर. >> पुणे - पेट्रोल 106.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लीटर >> ठाणे- पेट्रोल 105.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लीट >> नाशिक- पेट्रोल 106.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लीटर >> नागपूर- पेट्रोल 106.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.14 रुपये प्रति लीटर >> औरंगाबाद- पेट्रोल 106.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लीटर >> जळगाव- पेट्रोल 107.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लीटर >> कोल्हापूर- पेट्रोल 106.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.54 रुपये प्रति लीटर RBI ची 'या' बँकेवर मोठी कारवाई; ग्राहकांना बँकेतून फक्त 15000 रुपये काढता येणार पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर कसे तपासता येतील? तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या