मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; तुमच्या शहरातील किमती पाहा

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; तुमच्या शहरातील किमती पाहा

Petrol-Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांनी जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. मात्र, राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे

  मुंबई, 18 जुलै : इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आज 18 जुलै 2022 साठी नवीन पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर अजूनही स्थिर आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटच्या ताज्या अपडेटनुसार, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर आजही दिलासा कायम आहे. भारतीय तेल कंपन्यांनी जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. मात्र, राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झालं आहे. वाहनांच्या इंधनाचे दर स्थिर असताना पोर्ट ब्लेअरमध्ये स्वस्तात पेट्रोल-डिझेल विकले जात आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे. GST Rate Hike: आजपासून दही, पीठ, पनीरसह अनेक वस्तू महाग होणार, हॉस्पिटलचा खर्चही वाढणार; चेक करा लिस्ट
   कच्च्या तेलाच्या दरात वाढ
  जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सातत्याने घसरणीचा सामना करणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरात आता पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूडच्या किमतीने पुन्हा 100 डॉलर प्रति बॅरलची पातळी ओलांडली. 31 जुलैआधी 'ही' कामं करा, अन्यथा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो राज्यातील प्रमुख शहरांतील इंधनाचे दर >> मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर. >> पुणे - पेट्रोल 106.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लीटर >> ठाणे- पेट्रोल 105.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लीटर >> नाशिक- पेट्रोल 106.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लीटर >> नागपूर- पेट्रोल 106.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.14 रुपये प्रति लीटर >> औरंगाबाद- पेट्रोल 106.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लीटर >> जळगाव- पेट्रोल 107.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लीटर >> कोल्हापूर- पेट्रोल 106.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.54 रुपये प्रति लीटर
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

  पुढील बातम्या